7 जानेवारीला भव्य कुस्त्यांची दंगल; पंधरा दिवस सुरू राहणार यात्रोत्सव
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील ब्रम्हगांव येथिल श्रृंगेरी देवी हे जागृत ग्रामदैवत आहे. या गडावर वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. याचपैकी पौष महिन्यात पंधरा दिवस चालणारा यात्रा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. यात्रा उत्सवाची सुरुवात सालाबादप्रमाणे पौष पौर्णिमेला दि.6 जानेवारी पासून होत आहे. श्रृंगेरी देवस्थान ट्रस्ट च्यावतीने याञा उत्सवाची जोरदार तयारी केली असुन भाविकांना दर्शनासाठी अडचणी येणार नाहीत याची देखील काळजी ट्रस्ट घेत आहे.
आष्टी-पाटोदा तालुक्याच्या सीमेवर बालाघाटच्या पर्वत रांगेत निसर्गरम्य अशा ठिकाणी श्रृंगेरी देवी देवस्थान गड आहे. श्रृंगेरी देवी गडावर वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. यामध्ये नवराञी उत्सव आणि पौष महिन्यात पौष पौर्णिमेपासून ते पौष अमावस्या असा पंधरा दिवस चालनारा याञा उत्सव हे उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरे केले केले जातात. यावर्षीच्या पौष पौर्णिमेचा याञा उत्सव हा दि.6 जानेवारी 2023 पासुन सुरुवात होत आहे. दि.7 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. पासुन भव्य कुस्त्यांची दंगल श्रृंगेरी गडावर आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह पंचक्रोशीतील मल्ल मोठ्या संख्येने सहभागी होत असतात अशी माहिती देवस्थानच्या वतीने देण्यात आली.
गेल्या काही वर्षांमध्ये श्रृंगेरी गडावर भाविक भक्तांच्या मदतीने विविध विकास कामे सुरू आहेत. भाविक भक्तांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी देवस्थान प्रयत्न करत आहे. सुरू होत असलेल्या याञा उत्सवाची जय्यत तयारी झाली असुन पौष पौर्णिमेपासून देवीगड भावीकांनी फुलून जाईल अशी प्रतिक्रिया श्रृंगेरी देवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मेजेर विजय हराळ यांनी सांगीतले.
महाराष्ट्रातून दर्शनासाठी येतात भाविक
श्रृंगेरी देवी हे जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्रभर भाविक भक्त असल्याने वर्षेभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र पौष पौर्णिमेपासून सुरू होत असलेला याञा उत्सव हा भाविकांसाठी दर्शनासाठी पर्वणी असते. त्यामुळे या काळात राज्यभरातून दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावतात.
Leave a comment