बीड । वार्ताहर
पुरोगामी पत्रकार संघ व महिला विकास संघाच्या वतीने विविध आरोग्य क्षेत्रातील उत्तम काम तसेच उत्तम प्रशासन सांभाळल्याबद्दल, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांचा राज्यस्तरीय लोकरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मंगळवारी (दि. 3) माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे, गटविकास अधिकारी सचिन सानप, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन डॉ. सुरेश साबळे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. साबळे म्हणाले, दीड वर्षांपूर्वी कारभार हाती घेतल्यानंतर आरोग्य सेवेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, असे जाणिवपूर्वक प्रयत्न केले. सर्व अधिकारी व कर्मचार्यांच्या सहभागामुळे याला यशही आले. र्हदयशस्त्रक्रीया सोडता सर्व शस्त्रक्रीया जिल्हा रुग्णालयात होत आहेत. सामान्यांकडून यंत्रणेचे कौतुक होत असल्यानेच कामाला हुरुप येत आहे. गरिबांच्या चेहर्यावरील हास्य व समाधानातच काम केल्याचे फलित मिळते. माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, फारुक पटेल यांनीही डॉ. सुरेश साबळे यांच्या पुढाकाराने जिल्हा रुग्णालयातील सुधारलेल्या आरेग्य व्यवस्थेचे कौतुक करण्यात आले. खर्या अर्थाने लोकाभिमुख जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्ह्याला मिळाल्याचे प्रा. नवले व श्री. पटेल म्हणाले. यावेळी किशोर पिंगळे, शारदा डुगलच, दिनेश पवार, डॉ. लक्ष्मण जाधव, सिमा ओस्तवाल आदींसह संयोजक भागवत वैद्य, विजय पोकळे, संतोष जाधव, विजय सुर्यवंशी, दत्ता नरनाळे आदींची उपस्थिती होती.
Leave a comment