वाढवणा, कानडीघाट, लोणीघाट, गोलंग्रीत लोढा गटाचे सरपंच

बीड । वार्ताहर

तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गटाती ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणूकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य अशोकजी लोढा यांचे एकहाती नेतृत्व आणि वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. 20 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनंतर अंतिम निकाल हाती आला. यात वाढवणा, कानडीघाट, लोणी घाट आणि गोलंगी येथे अशोक लोढा पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय अंजनवती ग्रापपंचायतमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व अशोक लोढा गटाचा उपसरपंच निवडून आला आहे. ततसेच बोरखेड ग्रा.पं.मध्ये 3 सदस्य तर घारगाव-सुलतानपुर ग्रा.पं.मध्ये 6 सदस्य निवडून आले. विजयी सरपंच,सदस्यांनी गुलाल उधळून पेढे वाटत एकच जल्लोष साजरा केला. या सर्व यशाचे श्रेय या गावातील सर्वसामान्य बहाद्दर मतदारांना असल्याची नम्र भावना जि.प.सदस्य अशोक लोढा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

बीड तालुक्यातील 132 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यात अर्ज मागे घेण्याच्या कालावधीपर्यंत 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे तालुक्यातील उर्वरित 121 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली होती, त्याची मतमोजणी 20 डिसेंबर रोजी बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात पार पडली. यात अशोक लोढा पॅनलने विकासाच्या मुद्यावर मतदारांना केलेले आवाहन कामी आले असून वाढवणा येथे संगमेश्वर ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार मनिषा बारीकराव हगारे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. याशिवाय कानडीघाट ग्रा.पं.निवडणूकीत जनसेवा ग्रामविकास आघाडीच्या सौ.संध्या गोकुळ कुडके या सरपंचपदी निवडून आल्या. तसेच लोणीघाट ग्रा.पं.मध्ये लोढा पॅनलच्या सौ.प्रतीक्षा मारोती जाधव या सरपंचपदी निवडून आल्या आहेत.

 

गोलंग्री येथे सौ. मंगल आत्माराम कवडे या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. या चार ग्रामपंचायतीही अंजनवती जि.प.गटात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व अशोक लोढा गटाचा सदस्य निवडून आला. घारगाव-सुलतानपूर येथील निवडणूक अटीतटीची झाली या ठिकाणी लोढा यांच्या पॅनलचे सहा सदस्य निवडून आले आहेत तर बोरखेड ग्रा.पं.मध्येही तीन सदस्य निवडून आले असून रुईगव्हाण-माळेवाडी ग्रा.पं.मध्ये योगिता सचिन भरणे यांचा विजय झाल्याची माहिती जि.प.सदस्य अशोक लोढा यांनी दिली. तसेच बालाघाटावरील सर्वात मोठ्या चौसाळा ग्रा.पं.निवडणूकीतही भाजपाचे 5 सदस्य निवडून आले आहेत.सर्व विजयी उमेदवारांचे आणि त्यांना विजयी करण्यासाठी मतदान करुन गावविकासासाठी पुढाकार घेणार्‍या सुज्ञ मतदार बंधू-भगिणींचे तसेच या निवडणूकीसाठी ज्यांनी परिश्रम घेतले अशा सर्व भाजपा कार्यकत्यांचे अशोक लोढा यांनी आभार मानले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.