बीड | वार्ताहर

 

 बीड आणि शिरूर तालुक्यात झालेल्या पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने बाजी मारली असून सत्ता नसतानाही मतदारसंघातील 71 ग्रामपंचायतवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. काल निकालाच्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून विजयी उमेदवारांचे संपर्क कार्यालयात माजी मंत्री क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांनी भव्य स्वागत केले.

बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये 704 गावांमध्ये मतदान घेण्यात आले. त्यात बीड तालुक्यातील 132 आणि शिरूर तालुक्यातील 07 ग्रामपंचायतसाठी मतदान घेण्यात आले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे ठिकठिकाणी पॅनल उभा करण्यात आले होते. सुरवातीपासूनच प्रत्येक गावात प्रचारादरम्यान पॅनलला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता. गावातील ग्रामस्थांची झालेली कामे आणि गावच्या विकासासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलेल्या प्रयत्नाला गावकर्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांनी अनेक गावांमध्ये भेटी-गाठी घेऊन मतदारांना आपल्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक गावात प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले पॅनल विजयी करण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. आज झालेल्या मतमोजणीत बीड मतदारसंघात 63 आणि शिरूर तालुक्यातील 5 गावांमध्ये घवघवीत यश मिळवले तर मतदानापुर्वीच 3 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या ज्यामध्ये खर्डेवाडी / तांदळ्याचीवाडी, मसेवाडी, बाभूळखुंटा या ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर शिरूर तालुक्यात हाजीपूर, खालापुरी, शिरापूर गात, पौंडूळ आणि कमळेश्‍वर धानोरा या पाच ठिकाणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाचे पॅनल निवडून आले आहेत. बीड तालुक्यात मुर्शदपूर, इट, साक्षाळपिंपरी, पारगाव शिरस, कुक्कडगाव, काठोडा, बर्‍हाणपूर, काळेवाडी, आंबे सावळी, जुजगव्हाण, काळेगाव हवेली, जरूड, सांडरवन, भवानवाडी, पिंपळादेवी, बाभूळ खुंटा, वलीपूर, घाट जवळा, मानकुर वाडी, साखरे बोरगाव, शिवणी, ढेकनमोहा, तांदळवाडी घाट, कोल्हार वाडी, उदंड वडगाव, सात्रा, काकडहिरा, येळंबघाट, बोरफडी, खंडाळा, घटसावळी/बकरवाडी, जैताळवाडी/ सानपवाडी, मंझेरी, चौसाळा, खडकी, रत्नागिरी / कारेगव्हण, पौंडूळ, अंजनवती, भाळवणी, रौळसगाव, रूईगव्हाण / माळेवाडी, गोलंग्री, महाजनवाडी, लोणीघाट, हिंगणीखुर्द, मांडवजाळी, वाढवणा, कुमशी, नागापूर खुर्द, खांडेपारगाव, बेलगाव, दहीफळ / चिंचोली, आडगाव, केसापुरी परभणी, सुर्डी, बोरखेड, चिंचोली माळी, नागापूर, घारगाव / सुलतानपूर या गावांमध्ये माजी मंत्री क्षीरसागर यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. तर पाली या गावात 13 पैकी 11 ग्राम पंचायत सदस्य निवडून आले आहेत तसेच चाकरवाडी येथे 7 पैकी 5 सदस्य माजी मंत्री क्षीरसागर गटाचे निवडून आलेआहेत. निकालाच्या दिवशी पहिल्या फेरी पासूनच विजयी उमेदवारांचे संपर्क कार्यालयात भव्य स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ.योगेश क्षीरसागर हे उपस्थित होते. सत्ता नसतानाही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 70 ठिकाणी भरघोस मतदान घेऊन सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलीच चपराक दिली आहे. ज्या-ज्या गावांनी आपल्यावर विश्‍वास ठेवून गावच्या पॅनलला निवडून दिले त्या गावच्या विकासासाठी आपण कटीबध्द राहू असे माजी मंत्री क्षीरसागर यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.