एसबीआय पार्कींगमधील घटना
बीड । वार्ताहर
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पार्कींगमध्ये उभ्या कारला भीषण आग लागली. ही घटना 16 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बीड शहरात घडली.या घटनेमुळे बँक परिसरात नागरिकांची धावपळ उडाली.अनेकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ही आग खूप मोठी होती. कारमध्ये अतंर्गत शार्टसर्कीटने ही घटना घडल्याचे प्राथमिक कारण सांगीतले जात आहे.
बीड शहरातील राजुरीवेस भागात एसबीआयची शाखा आहे. या बँकेच्या पार्कींगमध्ये उभ्या कारला क्र.(एम.एच.20 एफटी 9799) 16 रोजी रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली.कारला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तसेच बीड ग्रामीण ठाण्याचे अंमलदार पी.टी.चव्हाण, आनंद मस्के यांनी तातडीने घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावरील अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली,मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. कारला आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र समजू शकलेले नाही.
-------------
Leave a comment