नेकनूर । वार्ताहर
शनिवारी सकाळी चुलत्याला ठार मारणाऱ्या मुळकवाडी खून प्रकरणातील आरोपीला स्थळ पाहणी करण्यासाठी घेवुन जाणाऱ्या पोलीस गाडीला मांजरसुंबा पाटोदा रोडवर ससेवाडी जवळ अपघात झला यामध्ये पोलीस अधिकारी शेख मुस्तफा कर्मचारी जखमी असून बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत आरोपींनी गाडीची टेरिंग ओढल्याने गाडी पलटी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .
नेकनूर पोलीस स्टेशन येथून पोलीस गाडीमध्ये api शेख मुस्तफा, पो.का.खाडे, देशमुख आणि दोन पंच मुळकवाडी खून प्रकरणातील आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ याला स्थळ पाहणीसाठी घेऊन चालले होते मधल्या सीटवरील आरोपीने चालकाच्या हातातील स्टेरिंग ओढल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली यामध्ये एपीआय शेख मुस्तफा डोक्याला आणि खाद्याला मार लागला असून त्यांच्यावर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत कर्मचारी ,आरोपी किरकोळ जखमी आहेत.
Leave a comment