मुंबई | वार्ताहर
संबंध राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता होणार असल्याची खात्रीपूर्वक माहिती समोर आली आहे.
आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केलेली होती, पण आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यभवणातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे.
सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याचा शपथविधी न झाल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचं दिसत आहे. कारण विधिमंडळ सचिवांना अधिकार्यांची एक तातडीची बैठक आज बोलावली होती.
Leave a comment