स्वस्तात बुलेट देण्याच्या आमिषाने तरुणाची हजारोंची फसवणूक
बीड । वार्ताहर
मोबाइल सर्वांच्या हातांच्या बोटावर सहजगत्या खेळणार सर्वात प्रभावशाली उपकरण. मात्र याच्या मोबाइलवरील सोशल मीडिया प्लॅटफार्मवर थोडी जरी चूक केली तर कसे आर्थिक नुकसान होतेय, याचे वेगवेगळे उदाहरणे घडणार्या घटनांवरुन समोर येत आहेत. शहरातील एक तरुण त्याचे फेसबूक खाते हाताळत होता.यादरम्यान त्याला स्वस्तात बुलेट दुचाकीची जाहिरात दिसली.त्याने संबधित जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला अन् इथेच त्याची फसवणूक झाली.समोरुन बोलणार्याने नंतर तरुणाला त्याच्या व्हाटसअप्वर बुलेटचे विविध फोटो पाठवून विश्वास संपादन करत वेळोवेळी फोन पे अॅपव्दारे 40 हजार 900 रुपये पाठविण्यास भाग पाडले,मात्र त्यानंतरही बुलेट तरुणाच्या पत्यावर पाठवलीच नाही.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने पोलीसात तक्रार दिली.
पोलीसांच्या माहितीनुसार, योगेश बप्पा पाटोळे (18 रा.बजरंग नगर,बीड) असे ऑनलाइन फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, 15 जुलै रोजी तो त्याच्या घरी फेसबुक हाताळत होता.यादरम्यान त्याला बुलेटची जाहिरात दिसली.त्यावर लिहिलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याने संपर्क साधत मला गाडी आवडली आहे, तिची फोटो पाठवा असे संबंधिताला सांगितले. त्या अनोळखी इसमाने योगेशच्या व्हाटसअपवर मोटो पाठविले.शिवाय 46 हजार रुपये इतकी बुलेटची किमंत असल्याने समोरुन बोलणार्याने योगेशला सांगीतली. त्याने योगेश यास गाडीच्या कागदपत्रांसाठी 2 हजार ऑनलाइन पाठवण्यास सांगीतले.
ते पैसे पाठवल्यानंतर पुन्हा संपर्क करुन योगेश यास त्याचा पत्ता विचारुन घेत गाडी उद्या दिलेल्या पत्यावर पोहोच होईल असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर 22 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास योगेशला एक कॉल आला. त्याने ‘मी डिलेव्हर बॉय बोलतोय,शहागडपर्यंत बुलेट घेवून आलोय.तुम्ही काही पैसे पाठवा’ असे सांगीतले. त्यावेळी योगेशने 11 हजार 200 रुपये पाठवले,मात्र त्यानंतरही संबधिताने वेगवेगळी कारणे सांगून योगेशच्या खात्यातून एकूण 40 हजार रुपये स्वत:च्या खात्यात टाकण्यास भाग पाडून फसवणूक केली. याप्रकरणी मो.क्र.8822314016 धारकाविरुध्द फसवणुकीसह माहिती तंज्ञज्ञान (सुधारणा) अधिनियमाच्या कलमानुसार गुन्हा दाखल झाला.पोलीस निरीक्षक केतन राठोड तपास करत आहेत.
Leave a comment