बीड । वार्ताहर
शहर आणि परिसरात दुचाकी चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. नागरिकही आपल्या वाहनाच्या सुरक्षितेच्या बाबतीत बेफिकिर राहत आहेत. चोरटे हीच संधी साधून किमती दुचाकी क्षणात हॅन्डल लॉक तोडून लंपास करत असल्याचे वारंवार घडणार्या घटनांतून स्पष्ट होत आहे. शहरातील सुभाष रोड व तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोरुन चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्या.
बीड शहर व शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर ठाणे हद्दीत तहसील कार्यालयाचा परिसर येतो. या ठिकाणाहून तारेश रमन गायकवाड (रा.माळीवेस,बीड) यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.(एम.एच.23 एव्ही.4202) चोरट्याने 13 जुलै रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली. 22 जुलै रोजी गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला. दुसर्या घटनेत सुभाष रोडवरील एका कपडा दुकानासमोरुन ज्ञानेश्वर आश्रुबा जगदाळे (रा.साखरे बोरगाव,ता.बीड) यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.एम.एच.42 यु 1898) चोरट्यांनी चोरुन नेली. 19 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
Leave a comment