बीड । वार्ताहर

राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत येत्या 19 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यामुळे 19 जुलै रोजी न्यायालयात होणार्‍या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत आज दि.14 जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित जिल्हाधिकार्‍यांना या निर्णयाबाबत लेखी पत्राव्दारे कळवले आहे.निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही.

 

बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, माजलगाव, धारुर, परळी व अंबाजोगाई या सहा नगर पालिकांसह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव (क्षरश्रसरेप), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92  नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.या निवडणूकीचा कार्यक्रम आता स्थगित करण्यात आला आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, 8 जुलै रोजी निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत येत्या 19 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यामुळे 19 जुलै रोजी न्यायालयात होणार्‍या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत या सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम 2022 याव्दारे स्थगित करण्यात येत आहे. सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल.निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही.
---

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.