जिल्ह्यात 24 तासात 31.4 मि.मी.पावसाची नोंद
बीड : जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून पावसाची संततधार कायम राहिली आहे. केज आणि अंबाजोगाई तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पाणी आल्याचे चित्र दिसून आले. केज तालुक्यातील होळ आणि बनसारोळा या दोन महसूल मंडळात मागील 48 तासात सलग 2 वेळेस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आज दि.14 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत प्रत्येकी तब्बल 89.8 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 31.4 मि.मी.पाऊस पडला आहे.
केज तालुक्यात सर्वाधिक 58.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 1 जुलैपासून आतापर्यंत 150.4 मि. मी. पावसाची जिल्ह्यात नोंद झाली आहे. जिल्ह्यात 14 जुलै 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जुलैपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. बीड 34.0 (131.5), पाटोदा 40.8 (122.4), आष्टी 14.0 (74.9), गेवराई 34.4 (165.5), माजलगाव 19.8 (164.5), अंबाजोगाई 37.7 (191.4), केज 58.9 (201.5), परळी 17.6 (197.3), धारूर 31.2 (157.1), वडवणी 25.6 (159.8), शिरूर कासार 61.1 (77.6).
Leave a comment