बीड | वार्ताहर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे लवकरच बीड जिल्हा दौर्यावर येणार आहेत. राज्यपाल कोश्यारी हे प्रथमच बीड जिल्हा दौर्यावर येत असल्याने त्यांच्या या दौर्याचे संपूर्ण नियोजन यशस्वीरित्या पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधीत यंत्रणेला याबाबत सूचनाही केल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आज दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यापक बैठकही आयोजित करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे येत्या 23 व 24 जून रोजी बीड जिल्हा दौर्यावर येत आहे. त्यांच्या या दौर्यानिमित्त जिल्हा प्रशासनाने नियोजन पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज सायंकाळी जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक बोलावली आहे. राज्यपाल जिल्हा दौर्यात नेमके कोणत्या ठिकाणी भेट देणार हे अद्याप समजू शकले नाहीत. परंतु त्यांच्या दौर्यात कुठलीही कमतरता भासू नये यासाठी यंत्रणेला सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Leave a comment