बीड | वार्ताहर
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज पाथर्डीमध्ये येत असून मोहटा देवीचे दर्शन झाल्यानंतर त्यांची राजकीय सभा होणार आहे. त्यापूर्वी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुकुंद गर्जे यांच्या घरी जाऊन पंकजा मुंडे भेट देणार आहेत. पाथर्डी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यातील पंकजा मुंडेंचे समर्थक मोठ्या संख्येने मोठा देवी गडावर जमले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्य नेतृत्वाने डावलल्यामुळे यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बीडमध्ये आणि औरंगाबादमध्ये केला दरम्यान हाडा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केलाच नसल्याचे पुढे आल्यानंतर बीडमध्ये त्यांच्या समर्थकांनी थेट विरोधी पक्षनेते दरेकर यांचे वाहन अडवले.
या सर्व घटना घडामोडी होत असताना त्यातच औरंगाबाद आणि जालना येथील आक्रोश मोर्चा पंकजा मुंडे यांची गैरहजेरी विविध पक्षातील नेत्यांनी त्यांच्याबद्दल केलेली राजकीय वक्तव्य आणि या सर्व पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी पाळलेले मौन यामुळे त्यांची राजकीय भूमिका काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे पाथर्डी येथे दाखल झाल्या असून कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आता पाथर्डी येथील सभेत पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान राज्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच पंकजा मुंडे या पार्श्वभूमीवर काय बोलतात याकडेही लक्ष लागले आहे.
Leave a comment