बीड | वार्ताहर
महसूल पथकामार्फत बीड तालुक्यात विविध ठिकाणी तहसीलदार बीड, यांनी अनधिकृत वाळुसाठे जप्त केले असून, त्याचा लिलाव करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, बीड या कार्यालयास सादर केला आहे. त्यानुसार सदर वाळूसाठ्याचा लिलाव दि. 6 जून रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, बीड येथे करण्यात येणार आहे.
शासन निर्णय सुधारित रेती धोरण 28 जानेवारी 2022 मधील तरतुदीनूसार अवैध उत्खनन व वाहतूक कार्यवाहीत जप्त वाळूसाठ्याबाबत नमूद अटी व शर्ती बंधकारक राहतील. लिलावात भाग घेण्यासाठी 25 टक्के अनामत रक्कम डी.डी. धनादेशाने जमा करावी लागेल. त्याशिवाय लिलावात भाग घेण्यास परवानगी दिली जाणार नाही. सर्वोच्च बोलीची रक्कम एक रकमी लिलाव झाल्यानंतर लगेच दोन दिवसात भरणा करावी लागेल.
सदरचा लिलाव तहसील कार्यालय, बीड येथे करण्यात येणार असून, तहसीलदार बीड यांना अंतिम बोली करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे, अशी माहिती बीडचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिली आहे.
Leave a comment