धामणगाव जवळील कार अपघातात चार भावांचा मृत्यू
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी फाट्यावर एका कारला झालेल्या अपघातात बीडच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यु झाला आहे. ही घटना दि.11 मे रोजी सायंकाळी घडली. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी, लखन टेकवानी यांचा मृतात समावेश आहे. बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण बीडहून कारने (क्रमांक एम.एच.23 एएस A4025) नगरकडे जात होते. म्हसोबावाडी फाट्यावर त्यांची क्रेटा गाडी रस्त्याच्या कडेला जावून आदळली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यु झाला आहे.
टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंब म्हणून ओळखले जाते. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कसा झाला? हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. घटनास्थही नागरिकांची गर्दी झाली होती. आष्टी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह नजीकच्या रूग्णालयात हलवले. अपघातग्रस्त कारमधून पाच जण प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. या घटनेने बीड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी टेकवाणी यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटूंबीयांचे सांत्वन केले.
Leave a comment