गेवराई | वार्ताहर

 

 

तालुक्यातील तळणेवाडी येथील एका तरूणाला बनावट लग्न करून दोन लाख रुपयांचा गंडा घातला असल्याची तक्रार गेवराई पोलिसांत दाखल होती. या प्रकरणाशी निगडीत असणार्‍या मुख्य सुत्रधाराला शेवगाव येथून गेवराई पोलिसांनी अटक केली आहे .

 

तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) या व्यक्तीने औरंगाबाद येथील एका मुलीचे स्थळ आणले. दरम्यान नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल तर लग्नास सहमती दर्शविली. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख 60 हजार व 1 लाख 40 हजाराचा धनादेश दिल्यानंतर गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात दि.20 जुलै 2021 रोजी लग्न समारंभ पार पडला. दरम्यान दिलेला धनादेश आठ दिवसांत वठताच नवरी मुलगी रेखा हि माहेरी जाते म्हणून गेली. यानंतर वेळोवेळी वेगवेगळे कारणे देत ती परत आलीच नाही. यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला. तर तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना दोन अपत्य देखील असल्याचे नवरदेव मंडळींना कळताच त्यांना धक्काच बसला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापडीया यांना संपर्क साधला असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा, कोठे फिर्याद द्यायची ते करा म्हणत फोन कट केला. याप्रकरणी नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (तिघे रा.जाधववाडी औरंगाबाद सिडको), रामकिसन जगन्नाथ तापडीया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) व विठ्ठल किसन पवार (रा.सावरखेडा, औरंगाबाद, गंगापूर) या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात कलम 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणातील मुख्य सुत्रधार रामकिसन जगन्नाथ तापडीया याला गेवराई पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.