गेवराई । वार्ताहर
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन संतापलेल्या एकाने पत्नी आणि गावातील एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने सपासप वार करत गंभीर जखमी केले. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुक्यातील तळणेवाडी येथे गुरुवारी (दि.14) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
बबन ज्ञानोबा खरसाडे (50,रा.तळणेवाडी)असे चाकू हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर यात आरोपीची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. रामेश्वर गित्ते (रा.तळणेवाडी) असे आरोपीचे नाव असून तो घटनेनंतर फरार झाला. गावातील बबन खरसाडे यांच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन रामेश्वरने गुरुवारी रात्री सुरुवातीला पत्नी अनिता हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. नंतर शेेतात दारे धरत असलेल्या बबन खरसाडे यास पाठीमागून जावून धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला असून घटनेची माहिती मिळताच गेवराई ठाण्याचे उपनिरीक्षक तुकाराम बोडखे, पोह.उबाळे, पोशि. शेखर हिंगेवार आदींंनी तळणेवाडीत धाव घेतली. पोलीस अधिक तपास करत आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Leave a comment