बीड । वार्ताहर
जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच आहे. पिंपळनेर, गेवराई आणि परळीतील संभाजीनगर ठाणे हद्दीतून 4 नागरिकांच्या दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. या प्रकरणी संबंधित ठाण्यात अज्ञातांविरुध्द गुन्हे दाखल झाले.
गेवराई येथील खडकपुरा भागातील अब्दुल खय्युम पाशा यांची 20 हजार रु.किमतीची दुचाकी क्र.(एम.एच.23 व्ही. 6438) चोरट्यांनी शहरातील भगवती कॉम्पलेक्स समोरुन चोरुन नेली. 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुसरी घटना पाडळशिंगी (ता.गेवराई) येथील एका हॉटेलसमोर 19 ते 21 मार्चच्या दरम्यान घडली. नारायण श्रीमंत नलावडे (रा.कुंभारवाडी,ता.गेवराई) यांची 45 हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.(एम.एच.21 बीआर 3609) चोरुन नेली. तिसर्या घटनेत मोचीपिंपळगाव (ता.बीड) येथे 1 मार्च रोजी उघडकीस आली. अनंत रामभाऊ शिंदे (रा.गुंदावडगाव,ता.बीड) यांच्या मालकीची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी क्र.(एम.एच.23 एके.1227) चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडून चोरुन नेली. चौथ्या घटनेत कुरेशी मोसीन (रा.खुदबेनगर,परळी) यांची 15 हजारांची दुचाकी क्र.(एम.एच.44 आर 0396) शहरातीलच बरकतनगर येथील एका औषधी दुकानासमोरुन चोरट्यांनी लंपास केली.
Leave a comment