बीड / प्रतिनिधी
बीड तालुक्यातील अनेक गावातील सेवा सहकारी सोसायटीची सध्या निवडणूक सुरू आहे निवडणुका पार पडल्या असून काही ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक तर काही ठिकाणी सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध झालेले आहेत अशा एकूण 20 सेवा सहकारी सोसायटी या निवडणूका आतापर्यंत संपन्न झालेले असून त्या 20 पैकी 12 सेवा सहकारी सोसायट्या माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.
यामध्ये उदंडवडगाव, सांडरवण, आहेर वडगाव, बाभूळखुंटा, कर्झनी, राक्षसभुवन, या सोसायट्या पूर्ण बहुमताने आल्या आहेत.तर मोरगाव, पालवण ब, पाली, लोणी घाट,कोळ वाडी या सोसायट्या बहुमता मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आलेल्या आहेत तर चांदेगाव तेरा पैकी सात जागा, काळेगाव हवेली येथील तेरा पैकी सहा जागा ,पाटोदा बेलखंडी येथील 13 पैकी 6 जागा, पारगाव सिरस येथील 13 पैकी 6 जागा, कानडी घाट येथील बारा पैकी सहा जागा ,पालवन अ 13 पैकी दोन जागा, तर बोरखेड सेवा सहकारी सोसायटी मध्ये 13 पैकी तीन जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कडे आलेल्या आहेत. निवडून आलेल्या सर्व नूतन संचालकांचे अभिनंदन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली असून भविष्याच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.
Leave a comment