बीड । वार्ताहर
कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता नगरसेवक अमर नाईकवाडे व पालिकेचे गटनेते फारूक पटेल हे पुन्हा जिल्हा रुग्णालयात नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास उपलब्ध झाले आहेत. या अनुषंगाने त्यांनी सोमवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची भेट घेऊन रुग्णांना दिल्या जाणार्या सुविधांविषयी त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.
बीड जिल्ह्यासह तालुक्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड नियमांचे पालन करणे अनिवार्य झाले आहे. कोरोना बाधितांचा आकडा 129 एवढा आहे, त्यातील निम्मा म्हणजे 59 बीड तालुक्यातील आहे आणि त्यातील बहुतांश बीड शहरातील आहे. नागरिकांनी न घाबरता कोविड नियमांचं पालन करणे गरजेचे आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा रुग्णालयात कसल्याही प्रकारची मदत लागल्यास फारुख पटेल मो.क्र.9922454424 व अमर नाईकवाडे मोे.क्र.9028024111 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a comment