■ उमेशकुमार जेथलिया
शहराजवळील केसापुरी कॅम्प येथे नॅचरल फिश नावाने ताजे समुद्री मासे व गोड पाण्यातील जिवंत मासे उपलब्ध करून देणारे मराठवाड्यातील पहिले फिश शॉप मासे खवय्या च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी माजलगाव मध्ये सज्ज झाले आहे.
मुंबई च्या समुद्रकिनाऱ्या वरून काही तासात माजलगाव शहरात आता मासे खवय्या च्या आवडीचे मासे नॅचरल फिश येथे उपलब्ध झाले असून मराठवाड्यात या प्रकारचे हे पहिलेच फिश शॉप आहे.आता माजलगाव शहरात मुंबई च्या समुद्रातील हलवा,व्हाईट पोप्लेट, रावस,बांगडा,सुरमई,राणी फिश हे मुख्य प्रकार व इतर सी फिश उपलब्ध झाले आहेत.
शिवाय माजलगाव च्या धरणातील व गोड्या पाण्यातील वाम्मट,कथला, राहू,चिलापी,मरळ हे मासे जिवंत मिळणार आहेत.या नॅचरल फिश होम मध्ये पाण्याचे टॅंक बनवले असून धरणातून जिवंत मासे पकडून टँकर द्वारे पाण्यासह ते टॅंक मध्ये सोडले जाणार आहे.खवय्याना हवा तो मास जिवंत व फ्रेश मिळणार आहे.आ प्रकाश सोळंके,मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक दक,मत्स्य उपायुक्त सौ दीक्षित यांच्या हस्ते नॅचरल फिश शॉप चे उद्धघटन नुकतेच झाले
या व्यवसायाच्या माध्यमातून 10 ते 15 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे
.
अब्दुल सत्तार मागील 30 वर्षांपासून.....
मागील 30 वर्षांपासून माणींकशा मत्स्यव्यवसाय संस्थेच्या माध्यमातून शेख अब्दुल सत्तार यांचा पूर्ण कुटुंब मत्स्यव्यवसायाशी निगडित विविध व्यवसायात आहेत.यात मासे पकडण्यासाठी लागणारे गळ,तरफ व जाळे आदी साहित्य विक्री तसेच मत्स्य बीज निर्मिती चा व्यवसाय असून मराठवाड्यात सर्वदूर त्यांचे मत्स्य बीज जातात. मागील काही वर्षांपासून माजलगाव धरणाचा मत्स्य ठेका ही त्यांच्या संस्थे कडे असून आता नॅचरल फिश मार्फत मासे विक्रीच्या व्यवसायात ते उतरले असून लवकरच मासे तयार करून विविध मासे खवय्या ना बनवून दिले जाणार आहे.असे मुख्तार सत्तार यांनी संगितले
Leave a comment