आज जिल्ह्यात 26 नवे रुग्ण
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी (दि.8)
जिल्ह्यात कोरोनाचे नवे 26 रूग्ण निष्पन्न झाले.गेल्या काही दिवसात रूग्णांची ही मोठी वाढ आहे.
शुक्रवारी जिल्ह्यातील 1737 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शनिवारी दुपारी मिळाले. यात 1711 निगेटिव्ह तर 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक 10, अंबाजोगाई 4, आष्टी 1, धारूर 2, गेवराई 1, केज 2, माजलगाव 1, परळी 3 व शिरूर कासार तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
Leave a comment