अत्यंत चिंताजनक! रुग्णसंख्येनं 20 हजारचा टप्पा ओलांडला

मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने  हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. बुधवारनंतर गुरुवारीही मुंबईतील नव्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळाली आहे. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 20 हजार 181 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आढळल्यास मुंबईत लॉकडाऊन लावला जाईल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता मुंबईत 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने आता लॉकडाऊन लावलं जाईलं का? असा प्रश्न समोर येत आहे. 

पालिकेकडून सक्तीच्या उपाययोजना - 

एखाद्या इमारतीत किंवा विंगमध्ये राहत असलेल्या एकूण रहिवाशांपैकी 20 टक्के रहिवाशांना कोरोनाची बाधा झाल्यास संबंधित इमारत किंवा विंग सील केली जाणार आहे. कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाइनसाठी देण्यात आलेल्या निर्देशांचे आणि नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे. हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना सात दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल. ते पाचव्या किंवा सातव्या दिवशी आरटीपीसीआर करू शकतील. जर लक्षण आढळल्यास तात्काळ आरटीपीसीआर करावी लागेल असेही महापालिकेच्या नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.

चिंताजनक आकडेवारी

मुंबई आज दिवसभरात वीस हजारपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले असून कोणहीती लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्याही प्रचंड मोठी असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 17154 रुग्ण असे आढळून आले आहेत, ज्यांना कोणतीही लक्षणं नाही. अशा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, आज रुग्णालयात एकूण 1 हजार 170 रुग्णांचा दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिवसभरात एकूण 2 हजार 837 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका नोंदवला गेला आहे. तर तब्बल 67487 इतक्या चाचण्या मुंबईत करण्यात आल्या आहेत.

कालची आकडेवारी काय होती?

राज्यात कोरोनाचा फैलाव  आता अधिक चिंताजनक बनलाय. एकीकडे मुंबईत कालच्या तुलनेत जवळपास पाच हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे.. राजधानी मुंबईत (Mumbai) तर बुधवारीही कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळाला होता. मुंबईत बुधवारी (4 जानेवारी) तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण  आढळून आले होते. तर 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होत. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

आता लॉकडाऊन अटळ?

महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊन अटळ असल्याचंच अधोरेखित होताना पाहायला मिळतंय. आज झालेल्या रुग्णवाढीनंतर आता महापौर किशोर पेडणेकर यांच्या आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री मुंबईबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.