71 हजाराचा ऐवज लांबवला
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरी आणि घरफोडीचे सत्र सुरु आहे. आष्टी तालुक्यातील नागतळा येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने व रक्कम लंपास केले. 30 डिसेंबर रोजी भरदिवसा 11 ते 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नागतळा येथील शेतकरी अजिनाथ तुळशीराम सानप (64) हे 30 दुपारी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. या दरम्यान पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. नंतर कपाटातील 65 हजाराची रक्कम आणि 6 हजारांचे दागिने असा 71 हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सानप यांच्या फिर्यादीवरुन अज्ञातांवर अमळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
Leave a comment