धुळे-सोलापूूर महामार्गावरील घटना

बीड  । वार्ताहर

धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वरील गढी येथील सर्व्हिस रोडवर उभ्या कंटेनरमधून चोरांनी साड्यांचे पाच डाग हातोहात लंपास केले. 29 डिसेंबरच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. अज्ञातांवर गेवराई पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मधुकर हरी जाधव (रा.ढवळकेवाडी, ता.गंगाखेड) हे कंटेनर चालक त्यांचा कंटेनर क्र.(एम.एच.26 बीई.6617) मधून साड्यांचे डाग घेवून धुळे-सोलापूर महामार्गावरुन जात होते. 29 रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांचा कंटेनर गेवराई-बीड महामार्गावरील गढी येथील सर्व्हिस रोडवर उभा केला. यावेळी पाळत ठेवलेल्या चोरांनी कंटेनरच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आतील विविध कंपन्यांच्या 1 लाख 65 हजार 443 रुपयांचा 80 साड्या चोरुन नेल्या. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चालक मधुकर जाधव गेवराई ठाण्यात फिर्याद नोंदवली. अज्ञातावर गुन्हा नोंद झाला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.