स्पोटर्स क्लबमध्येच सुरु जुगार अड्डा; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड । वार्ताहर

बीड शहरालगतच्या तळेगाव शिवारातील एका स्पोर्टस् क्लबमधील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. 28 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास केजचे सहाय्यक अधीक्षक व आयपीएस पंकज कुमावत यांनी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या मोठ्या कारवाईत 47 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात काही वाहनांचाही समावेश आहे. महत्वाचे हे की, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह 50 जणांवर बीड ग्रामीण ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष मस्केंच्या जागेतच पत्याचा क्लब सुरू असल्याचे निष्पन्न झाल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
आयपीएस पंकज कुमावत यांनी 28 डिसेंबर रोजी रात्री 11: 10 वाजता त्यांनी चर्हाटा रोडवरील तळेगाव शिवारात स्पोर्टस् क्लबच्या जागेतील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी जुगाराच्या पत्यावर पैसे लावून तिर्रट खेळणार्या व खेळविणार्या  47 जणांना रंगेहाथ पकडले. जुगार्यांकडून रोख 1 लाख 51 हजार 940 रुपये , दोन चारचाकी, जुगार साहित्य व मोबाइल असा एकूण 75 लाख 62 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी हवालदार बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन जुगार खेळताना आढळलेल्या 47 जणांसह स्पोर्टस् क्लबचा मालक कल्याण पवार, जागा किरायाने घेणारा भाऊसाहेब सावंत व मूळ जागामालक भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यावर गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक पंकज कुमावत, हवालदार बालाजी दराडे, सचिन अहंकारे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, रामहरी भंडाणे, बीड ग्रामीण ठाण्याचे उपनिरीक्षक देविदास आवारे व सहकार्यांनी केली.महत्वाचे म्हणजे आयपीएस पंकज कुमावत यांनी जिल्ह्यात यापूर्वी गुटखा प्रकरणात धडक कारवाया केल्या.बीडमधील गुटख्याच्या गोदामावर टाकलेल्या धाडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद केल्याने कुमावत चर्चेत आले होते. पाठोपाठ त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीच्या जागेतील जुगारअड्डयाचा पर्दाफाश केला.

राजेंद्र मस्केंसह या 50 जणांवर गुन्हा

याप्रकरणी पोह.बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अनंत उर्फ बाळू शंकरराव शिनगारे (वय 45 रा.येळंबघाट), प्रल्हाद शंकर चित्रे (वय 36 रा.पालवन), अभिमान अर्जुन बागलाने (वय 59, रा.काकडहीरा), आनंद विठ्ठलराव ढास (वय 55 रा.घारगाव ता.बीड), बाळाचार्य मनोहर घोलप (वय 46 रा.तळेगाव ता.बीड), बिभीषण महादेव उदबत्ते (वय 31 काळा हनुमानठाणा, बीड), मोहन नारायण सिन्नोरकर (वय 52 काळा हनुमानठाणा, बीड), तात्यासाहेब अंबादास बहीर (वय 45 रा.रुई ता.वाशी), प्रदिप तुकाराम थोरात (वय 35 रा.कामखेडा), एकनाथ बाळनाथ खांडे (वय 41 रा.अंकुशनगर बीड), चत्रभुज भवानी वाघमारे (वय 38 रा.हिवराबावडी), पंडित आश्रुबा परझने (वय 34 खालापूरी ता.बीड), हनुमंत बाजीराव बहीर (33 रा.रुईपारगाव ता.वाशी), हरीदास जनार्धन घोगरे (55 नंदनवननगर बालेपीर), राहुल विठ्ठल वंजारे (42 रा.येळंबघाट), कल्याण ज्ञानोबा पारखे (32 रा.हिवरापहाडी), भगवान आश्रुबा पवार (45 रा.काळेगाव हवेली), सुरेश आदीनाथ काकडे (37 रा.जरुड), ज्ञानेश्वर पांडूरंग जगताप (45 रा.एकनाथनगर बीड), सय्यद जमीरोद्दीन कमरोद्दीन (55 रा.शिरापूर धुमाळ), उमेश चंद्रकांत जाधव (38 शिरापूर धुमाळ), भास्कर विठ्ठल जायभाये (49 रा.काकडहीरा), अशोक रामचंद्र सानप (47 कालिकानगर, बीड), राजु चांदमिया पठाण (39 रा.पारगाव), शेख एकबाल शेख हाजी (48 रा.राजुरीवेस कटकटपुरा), लक्ष्मण पांडुरंग शिंदे (45 रा.गिरामगल्ली बीड), उद्धव अभिमान घोलप (32 रा.तळेगाव), नितीन भागवत शिनगारे (रा.येळंबघाट), चंद्रकांत भीवाजी त्रिमुखे (29 रा.नांदूरघाट), श्रीराम रावसाहेब मुंजाळ (50 रा.निगडी जि.पुणे), निलेश तुळशीराम सवासे (26 रा.शुक्रवार पेठ,बीड), रमेश गुलाब औसरमल (45 रा.शिरापुर धुमाळ), त्रिंबक संतोबा वीर (52 रा.सुर्डीखोत), सुधिर आबासाहेब सुपेकर (59 रा.शिवणी), धनंजय मिठ्ठू कसपटे (32 रा.नवगन राजुरी), पारसनाथ मनोहर रोहिटे (33 रा.आहेरवडगाव), संतोष चंद्रसेन बहिर (29 रा.नवगण राजुरी), संतोष सर्जेराव गावडे (35 रा.नवगण राजुरी), बाळु कारभारी कावळे (36 रा.बावी), बापुराव विठ्ठल घोडके (42 रा.लोळदगाव), नामदेव प्रल्हाद लाटे (32 रा.बेलुरा), दुषांत रोहिदास ससाणे (34 रा.पालवण), विकास अशोक मस्के (34 रा.पालवण), अशोक भिवराव मस्के (38 रा.अर्धमसला), संभाजी श्रीधर गिराम (38 रा.पारगाव ता.वाशी), मोहन मधुकर सुर्यवंशी (30 रा.पाथरी), बंडू किसन काळे (49 रा.कालिकानगर, बीड), कल्याण ज्ञानोबा पवार (रा.दगडीशहाजनपूर), भाऊसाहेब हनुमान सावंत (रा.नवी मुंबई), राजेंद्र तुकाराम मस्के (रा.बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

किरायाची जागा किरायाने

बीड लगतच्या तळेगाव शिवारातील ही जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची आहे. कल्याण पवार (रा.दगडी शहाजानपूर ता.बीड) यांनी स्पोर्टस् क्लबसाठी ती किरायाने घेतली होती. पत्र्याचे शेड उभारुन त्यात स्पोर्टस् क्लब तयार केले होते. मात्र, नंतर पवार यांनी ही जागा भाऊसाहेब सावंत (रा.नवी मुंबई ) यांना किरायाने दिली. तेथे स्पोर्टस् क्लबच्या आडून जुगाराचा खेळ सुरु होता, त्यामुळे तिघांनाही आरोपी केले आहे.


तथाकथीत क्लबशी माझा संबंध नाही-राजेंद्र मस्के

चर्‍हाटा फाटा परिसरातील  पत्त्याच्या क्लबवर पोलिसांनी काल रात्री धाड टाकली आहे. काही वर्तमानपत्रांनी कोणती ही शहनिशा न करता ऐकिव माहीतच्या आधारेया पत्ता क्लब धाड प्रकरणातमाझे नाव गोवण्याचा प्रयत्न केला आहे.या क्लबशी माझा संबंध नसतानाही नाव आल्याने विनाकारण माझी बदनामी होत आहे.सदरील जागा मदन मस्के यांच्या मालकीची असून त्यांनी इतरांना भाडे तत्वावर दिलेली आहे असा खुलासा या कारवाईनंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला.
बुधवारी दुपारी या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, संबंधित भाडेकरूने रितसर जिल्हाधिकारी कार्यालय करमणूक विभागा मार्फत सार्वजनिक मनोरंजन प्लेइंग कार्ड करिता परवाना काढलेला आहे.सदरील मनोरंजन पत्ता क्लब हा माझा नसून भाडेकरूनी जागा भाड्याने घेऊन टाकलेला आहे.या संदर्भातील सर्व कागदपत्रे पोलीस प्रशासनासमोर मांडलेली आहेत.या कागदपत्रात कुठेही माझ्या नावाचा उल्लेख अथवा संबंध नाही. याची पडताळणी पोलिस प्रशासनाने केलेली आहे. कृपया अर्धवट माहितीच्या आधारावर पत्ता क्लबच्या संदर्भातील कोणत्याही बातमीमध्ये माझे नाव गोवण्यात येऊ नये अशी आग्रहाची विनंती सर्व वर्तमानपत्र व प्रसिद्धी माध्यमांना करत आहे.
बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चालू केलेली अवैध धंद्या विरोधात सुरु केलेली धडक मोहीम  निश्चितच कौतुकास्पद आहे.परंतु ही मोहीम राबवत असताना वैध व अवैध धंद्याची पूर्ण माहिती घेऊनच कारवाई करणे उचित होईल.जिल्ह्यात अनेक प्रकारचे अवैद्य धंदे चालू असून सर्व धंदे बंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे.पोलिस प्रशासनाच्या या मोहिमेला पूर्ण समर्थन आहेअवैध धंद्या विरुद्धची मोहीम अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी आमचे पोलिस प्रशासनाला सहकार्य असेल असेही राजेंद्र मस्के यावेळी म्हणाले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.