परळी । वार्ताहर
परळी शहरातील आंबेडकरनगर भागात घरफोडीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी घराचे चॅनल गेटचे कुलूप व दरवाजा तोडून सोन्याचे, चांदीचे विविध दागिने नगदी रक्कम असा 48 हजार 935 रुपयांचा ऐवज लंपास केला. संभाजीनगर ठाण्यात 20 डिसेंबर रोजी अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे.
परळी शहरातील आंबेडकरनगर येथे शारदाबाई नारायण साबणे यांचे घर आहे. 12 ते 16 डिसेंबरच्या दरम्यान चोरट्यांनी साबणे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन घराचा दरवाजा तोडून कपाटाचे कुलूपही तोडले. नंतर सोन्याचे व चांदीचे 33 हजार रुपयांचे दागिने आणि नगदी रक्कम असा एकुण 48 हजार 935 रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शारदाबाई साबणे यांनी संभाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरुन अज्ञातावर गुन्हा नोंद झाला. पो.ना.घोडके अधिक तपास करत आहेत.
Leave a comment