बीड/प्रतिनिधी
आपल्या कुटुंबातील एक सदस्य भारत मातेच्या सेवेसाठी रुजू झाला आहे मातृभूमीसाठी समर्पित भावनेने सर्वस्वाचा त्याग करून पुढे जाणे महत्त्वाचे आहे पराक्रम आणि विक्रमाची ही परंपरा राखण्यासाठी बीड जिल्ह्याचे मोठे योगदान आहे लेफ्टनंट आदित्य मचालेच्या कर्तृत्वाची प्रेरणा इतर तरुणांनीही घ्यावी असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
आदर्श शिक्षण संस्था व नवगन शिक्षण संस्थेच्या वतीने भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल आदित्य मसाले यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच व्यासपीठावर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, विलास बडगे ,अरुण डाके, दिनकर कदम,नानासाहेब काकडे, डॉ योगेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, विनोद मुळूक,नितीन धांडे, लोकप्रश्न चे संपादक दिलीप खिस्ती आदि उपस्थित होते,प्रारंभी देशाचे तिन्ही दलाचे प्रमुख जनरल स्व बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर स्व काकू नानांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी मचाले परिवाराच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी सभागृहात लेफ्टनंट आदित्य मचाले वर आधारित त्याची यशोगाथा सांगणारी चित्रफीत दाखवण्यात आली,प्रास्ताविक महेश मचाले यांनी केले तर सूत्र संचलन डॉ संजय पाटील देवळानकर यांनी केले,यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, भारतीय सैन्य दलात बीड जिल्ह्याचा तरुण जातोय ही अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे प्रतिकूल परिस्थिती असतानाही अनेक तरुणांनी जिद्दीच्या जोरावर उच्च पदावर पोहोचून बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असतो आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या ध्येयाकडे केंद्रित केला तर जे ठरवले तेच होते शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होतो लेफ्टनंट आदित्य मसाले याने अत्यंत प्रेरणादायी असे काम केले आहे आपल्याच कुटुंबातील एक सदस्य भारत मातेच्या सेवेसाठी रूजू झाला आहे मातृभूमीसाठी समर्पित भावनेने सर्वस्वाचा त्याग करून पुढे जाणे महत्त्वाचे असते पराक्रम आणि विक्रमाची ही परंपरा राखण्यासाठी बीड जिल्ह्याने मोठे योगदान दिले आहे महाराष्ट्राने देखील प्रतिकूल परिस्थितीत पुढे जाण्याची परंपरा कायम ठेवली आहे पासून ते राष्ट्रसेवक पर्यंत विविध क्षेत्रात बीड जिल्ह्यातील तरुणांचा सहभाग आहे याचा प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा गुणवत्तेत जो टिकेल तोच स्पर्धेत टिकतो, भारतीय सैन्याच्या जीवावरच आपण आणि आपला देश आज सुरक्षित जीवन जगत आहे भारताकडे वाकड्या नजरेने पाहणारांचे डोळे फोडून टाकण्याची धमक जनरल माणिक शहा यांनी दाखवली होती जनरल मानेक शहा यांच्या नेतृत्वात झालेले युद्ध आपण जिंकले होते महाराष्ट्रातून आजही दोन व्यक्तींचा समावेश भारतीय सैन्यात प्रमुख पदावर आहे याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा मुलांवर लहानपणापासून संस्कार करून त्यांचे भविष्य आणि भवितव्य घडवायला हवे हे आदित्य कडे पाहून लक्षात येईल शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मचाले परिवाराने कष्टाने, श्रमाने यश मिळवून कर्तत्व सिद्ध केले आहे, आदित्य मचालेच्या आदर्शाने नवतरुणांना प्रेरणा मिळेल सैन्यात आपलं मुल दाखल करताना काळजावर दगड ठेवून त्याग करावा लागतो माता-पिता यांसाठी हा गौरवाचा क्षण आहे स्वतःच्या कर्तुत्वावर लेफ्टनंट होणं ही गौरवाची बाब असून ज्या विभागात आदित्यची निवड झाली त्या विभागात आणखी यश त्याला मिळावे ही बीड जिल्ह्याच्या वतीने आदित्यला शुभेच्छा देतो असे सांगून त्यांनी सेनापती बापट आणि स्वा सावरकर यांचे राष्ट्राबद्दलचे विचार देखील मांडले,
यावेळी आभार प्रदर्शन करत असताना युवा नेते डॉक्टर योगेश शिरसागर म्हणाले की आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्ती करणारा एक युवक भारतीय सैन्यात दाखल होतो आणि मोठ्या पदावर जातो हे बीड करांसाठी गौरवाचे आणि अभिमानाचे आहे मोठ्या पदावर निवड होणारा आदित्य हा एकमेव तरुण असून अवघ्या तेविसाव्या वर्षी मिळालेले हे यश बेडची मान उंचावणारे असून स्वर्गीय काकूंनी बीड जिल्ह्यातील युवकांचा समावेश व्हावा यासाठी सैनिकी विद्यालय सुरू करून अनेक तरुणांना देश सेवेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आदित्य सारख्या तरुण आदर्श इतर तरुणांनीही घेतला तर बीड जिल्ह्यातील अनेक तरुण मोठमोठ्या पदावर दिसतील अशी त्यांना अपेक्षा व्यक्त केली या कार्यक्रमासाठी सैनिकी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी सैनिक व शिक्षक वृंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ.योगेश क्षीरसागर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार
भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आदित्य मचाले यांचा डॉ.योगेश क्षीरसागर मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने भारतीय सैन्याच्या तीन्ही दलाचे प्रमुख स्व.बिपीन रावत यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. येथील सैनिकी विद्यालयाचे विद्यार्थी व के.एस.के.महाविद्यालयाचे एन.एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना परेड करत आदित्य मचाले यांचे स्वागत केले.
Leave a comment