बीड । वार्ताहर
नऊ महिन्यांचे खडतर सीआयडी प्रशिक्षण पुर्ण करुन ‘टौरस’ म्हणजेच (गुन्हेशोधक) श्वान गुरुवारी (दि.7) बीड पोलीस दलात गुन्हे तपासकामी सज्ज झाला आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकात आत ‘टौरस’ कर्तव्य बजावणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी ही माहिती दिली.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या मंजुरीने पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या वतीने श्वान टौरस ‘बेल्जियम शेफर्ड’ याचे खरेदी व संगोपन बीड येथे करण्यात आले. श्वान टौरस हा गुन्हे तपासादरम्यान घटनास्थळी संशयित आरोपीच्या वस्तू मिळून आल्यास त्या वस्तुचा वासावरुन माग काढण्यात तरबेज असून गुन्ह्यांच्या तपासकामाला गती मिळणार आहे. श्वान हस्तक म्हणून पोहेकॉ. संजय खाडे व अमोल तुपे हे काम पाहत आहेत.
टौरसचे गुन्हे तपासासाठी माग काढण्याचे प्रशिक्षण 4 जानेवारी 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 या कालावधीत अप्पर अधीक्षक, श्वान प्रशिक्षण केंद्र, सीआयठी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हे प्रशिक्षण बीड श्वान पथकातच प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व अप्पर अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली पूर्ण झाले.
Leave a comment