बीड । वार्ताहर
खरीप हंगामासाठी नवीन पीक कर्ज मिळावे म्हणून चौसाळा सर्कल मधील शेकडो शेतकर्यांनी पीक कर्ज मागणीचे अर्ज चौसाळा एसबीआयकडे दाखल केले आहेत. मात्र जवळपास दोन तीन महिन्याचा कालावधी उलटूनही अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचीत आहेत.
बँकेला याबाबत विचारणा केली असता. बीड जिल्हा शाखेकडे बोट दाखवले जाते त्यामुळे हे पीककर्ज आहे की भीककर्ज आहे असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. येत्या 15 ऑक्टोबर पर्यंत पीककर्ज तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचा निपटारा न झाल्यास एसबीआयच्या चौसाळा शाखेसमोर 20 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करण्यात येतील असा इशारा अविनाश मोरे यांनी दिला आहे.
Leave a comment