चौसाळा :- गेल्या महिनाभरापासून सतत चालू असलेल्या अतिवृष्टी मुळे पिंपळगाव ते वाढवणा पाटा वरून जाणारा रस्ता पूर्णपणे खचला आहे त्यामुळे वाढवणा गावाचा संपर्क सगळ्या बाजूने तुटला असून या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या विषयी अशोक लोढा याना हि माहिती मिळताच त्यांनी मंगळवारी समक्ष जाऊन पाहणी केली व वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल असे सांगितले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे कार्यकारी संचालक नितीन लोढा ,बिभीषण मुळे ,समाधान मुळे तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
Leave a comment