गोवा येथे होणार्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत झाली निवड
शिरूर कासार । वार्ताहर
तालुक्यातील खालापुरी येथील सोहेल इसाक शेख या विद्यार्थाने सांगली येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 51किलो वजन व17वयो गटात मोठ्या मेहनत व चपळाईने यश मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असुन गोवा येथे होणार्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सोहेलची निवड झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोहेल अत्यंत गरिब कुटुंबातील विद्यार्थी वडील इसाक शेख बीडमध्ये मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात सोहेल हा 15 वर्षाचाच असुन बीडमधील विनायक विद्यालयात ई 8मध्ये शिक्षण घेत आहे त्याच्या वडिलांना लहानपणी पासुन कुस्त्यांचा नाद असल्याने सोहेलाही त्यांनी चांगलेच घडविले वोळोवेळी चांगले डाव अंगिकारले सुरवातीला सोहेल बीडमध्ये झालेल्या तालुका स्तरावरील स्पर्धेत प्रथम आला नंतर केज येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत बाजी मारली तदनंतर उस्मानाबाद येथे झालेल्या स्पर्धेत विभागीय स्तरावर तो विजयी झाला नुकत्याच सांगलीत झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत मोठ्या चपळाईने 51किलो वजन गट व 17 वर्षीय वयो गटात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. सोहेल 15 वर्षाचा वजन 48 किलो असुन इ.8 वी मध्ये असताना त्याने 17 वयोगट व 51 किलो वजन गटात खेळुन राज्य स्तरावर मजल मारली हे विशेष आता त्याची गोवा येथे होणार्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याने त्याचा माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांनी सत्कार केला .तसेच खालापुरी गावसह शिरूरकासार तालुक्याची शान मान उंचावल्याने सरपंच किरण परजणे, उपसरपंच अशोक भोसले, माजी सरपंच डिगांबर गवळी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब डोके,युवा नेते गणेश घोलप, पत्रकार जगन्नाथ परजणे ,रविंद्र परजणे, सोमिनाथ डोके यांच्या असंख्य नागरिकांनी सोहेलचे अभिनंदन करून कौतुक केले.
Leave a comment