किल्लेधारूर । वार्ताहर
कोरोनाचं संकट पाहता काही काळापुर्वी सुरु करण्यात आलेली मंदिरं पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. भाविकांसाठी ही मंदिरं बंद असली तरीही त्यामध्ये पुरोहितांना मात्र पूजाअर्चा करण्याची परवानगी होती. आता मात्र कोरोना काहीसा नियंत्रणात येत असताना प्रशासनानं पुन्हा एकदा राज्यातील मंदिरं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.किल्लेधारूर शहरापासुन अवघ्या तिन किलोमिटर अंतरावर असणार्या अंबाचडी मातेच्या दर्शनासाठी पहिल्याच माळेला मोठी गर्दी दिसुन आली
घटस्थापनेच्या मुहूर्तावर तालुक्याची ग्रामदैवत असणा-या अंबाचंडी मातेच्या मंदिर देखील (गुरुवारी) पहाटे पाच वाजल्यापासून खुलं करण्यात आले. पहाटेपासूनच याठीकाणी भाविकांची गर्दी दिसुन आलीनवरात्र उत्सवाच्या काळामध्ये अंबाचंडी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक राज्यभरातुन देवीच्या दर्शनासाठी येत असतात. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आंबाचंडी मातेचे मंदिर खुले झाल्याने गेल्या वर्षभरापासून सुनं सुनं वाटणारं अंबाचंडी मंदिर भक्तांनी फुलून गेलं आहे
Leave a comment