बीड । वार्ताहर
माँ वैष्णोदेवी मंदीर देवस्थान ट्रस्ट विप्रनगर ब्राम्हणवाडी, बीड याठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.7) घटस्थापना मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.महादेव महाराज (चाकरवाडीकर) नगरसेवक अमर नाईकवाडे, कोविडयोद्धा डॉ.नरेश कासट, विषाणी डिजीटलचे संचालक प्रविण विवाणी, बंडुप्रसादजी शर्मा,अमर भालेराव, अरविंद कोरडे साहेब, संतोष झंवर, नितीन मंत्री, संस्थापक अध्यक्ष संतोषजी सोहनी, कोषाध्यक्ष संजय सोहनी, विश्वस्त शिवप्रसाद दायमा, महेश लडा, पवन शर्मा, मोहित कासट, स्वप्नील देशमुख, दिगंबर गजें व विप्रनगरमधिल सर्व भाविक भक्त उपस्थित होते.
घटस्थापनेच्या पूजेसाठी व पौराहित्य म्हणून मंदीर संस्थानचे पुजारी हरी महाराज, दुर्गेश डुबे महाराज, प्रकाश जोशी महाराज व गवळी मामा यांच्या मंत्रोच्चाराच्या आरंभाने पुजा व महाआरती संपन्न झाली. नवरात्रोत्सवात अष्टमी व नवमी या दिवशी नवचंडीयाग, नवदुर्गापुजन, होम हवन व महाआरतीचे यजमान मोहित कासट, संतोष झंवर, दर्शन खिंवसरा यांच्या हस्ते सपत्नीक नवचंडीयाग पुजन होणार आहे. नवरात्रोत्सव काळात सर्व भाविक भक्तांनी कोविड-19 सुचनांचे पालन करून दर्शनाचा लाभ घ्यावा. असे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष संतोष सोहनी यांनी आवाहन केले आहे.
Leave a comment