चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
शहरातील जालना रोडवरील फिनिक्स हॉस्पीटलमध्ये कार्यरत असणार्या एका डॉक्टरांचीच महागड्या कंपनीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. 4 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली. दरम्यान सीसीटिव्हीत चोरीचा हा सर्व प्रकार कैद झाला असून यात दोन चोरटे दुचाकी लंपास करताना स्पष्टपणे दिसत आहेत. शिवाजीनगर ठाण्यात या प्रकरणी घटनेच्या 24 तासानंतरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
डॉ.कृष्णा शंकर शिंदे (रा. सारडा नगरी,बीड) असे दुचाकी चोरीला गेलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. सोमवारी रात्री ते त्यांच्या दुचाकीवरुन क्र. (एम.एच.14 इएस.7286) बीड शहरातील फिनिक्स रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते. रुग्णालयाच्या पार्कींगमध्ये उभी असलेली त्यांची दुचाकी दोन चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुग्णालयाचे सीसीटिव्ही तपासण्यात आले असता त्यात दोन पिवळ्या रंगाचे शर्ट घातलेले चोरटे दुचाकी पळवून नेताना दिसले. त्यानंतर डॉ.शिंदे यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली, मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
Leave a comment