शर्मा प्रकरणी पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट
बीड | वार्ताहर
करूणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी आजवर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. जेव्हा हे प्रकरण चर्चेत होतं तेव्हाही पंकजा मुंडे काहीही म्हणाल्या नव्हत्या. त्यांनी या सगळ्या प्रकरणावर मौन बाळगलं होतं. आता मात्र पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच करूणा शर्मा या बीडमध्ये आल्या होत्या. त्यांच्या कारमध्ये पिस्तुल सापडल्या प्रकरणी त्यांना अटक झाली. तसंच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. आता या प्रकरणी पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे..
परळीचे नाव राज्यात नव्हे तर देशभरात नावलौकिक आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी शहरात आहे. यामुळे देश-विदेशातील भाविक या ठिकाणी येत असतात. तसेच दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, स्व.प्रमोद महाजन यांनी परळीचे नाव राजकीय पटलावर चांगलेच गाजवले. एक वेळ तर अशी होती की, राज्याचे महत्त्वाचे निर्णय परळीतून घेतले जात.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीचे नाव चर्चेत ठेवले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांनी. या भावडांनी एकमेकांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपामधून परळीला कायम मध्यवर्ती ठेवण्याचे काम केले. परळीचा जिल्हा हा बीड असला तरी आजही भाजप आणि राष्ट्रवादीचे महत्त्वपूर्ण निर्णय परळीतूनच घेतले जातात हे सर्वश्रूत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून करुणा शर्मा यांच्यामुळे परळीचे नाव वेगळ्याच कारणात चर्चेत येत आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी थेट कोणाचे नाव घेतले नाही मात्र नेमकेपणाने भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकड असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये , wrong president should not be set ! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !! अशा प्रकारचे ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
Leave a comment