बीड । वार्ताहर

शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज दि.26 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठान व झी टॉकीजच्या संयुक्त विद्यमाने संगीतमय श्रीरामकथा, विठ्ठलकथा आणि संतकथेच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. समाधान महाराज शर्मा (केज) हे संगीतमय श्रीरामकथेचे पुष्प गुंफणार आहेत, तर शंकर महाराज शेवाळे (पुणे) हे संगीतमय विठ्ठलकथेचे निरुपण करणार आहेत. तसेच ज्ञानेश्वर महाराज तांबे (पुणे) हे वारकरी सांप्रदायातील संत चरित्राचे पुष्प गुंफणार आहेत. भाविकाना मोफत प्रवेश असून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

आज दि.26 जून ते 1 जुलै या कालावधीत दररोज सकाळी 10 ते 1 या वेळेत समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून श्रीरामकथेचे निरुपण करणार आहेत. तसेच दुपारी 1 ते 3 या वेळेत शंकर महाराज शेवाळे संगीतमय विठ्ठलकथेचे निरुपण करतील. तर ज्ञानेश्वर महाराज तांबे हे संत चरित्राचे पुष्प गुंफणार आहेत. यात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत नामदेव महाराज, संत गोरा कुंभार या वारकरी सांप्रदायातील संतांचे चरित्र मांडणार आहेत. या तीनही कार्यकम्राचे चित्रीकरण आजपासून 1 जुलैपर्यंत सुरु राहणार असून  चित्रीकरणानंतर 11 जुलैपासून प्रक्षेपण होणार आहे. भाविकांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष गौतम खटोड व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Leave a comment

Switch to plain text editor

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.