आरक्षणाचे जनक शाहूंचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे मोहिमेवर

 

मराठा आरक्षणासाठी 5 जूनला बीडमध्ये मोर्चा-आ.मेटे

 

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.

 

 

संभाजी छत्रपती यांनी आज कोल्हापूर येथे शाहू महाराजांचं दर्शन घेऊन आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधून या दौऱ्यामागची भूमिका विशद केली. माझा राज्यव्यापी दौरा सुरू झाला आहे. मराठवाडा आणि खान्देशात जाऊन तिथे समाजाची भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

 

नेतृत्व करत नाही, भावना पोहोचवत आहे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल धक्कादायक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काय कायदेशीर मार्ग आहे, त्याची चाचपणी केली पाहिजे. त्यासाठी मी 27 मे रोजी मुंबईत जाणार आहे. 27 किंवा 28 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मी या आंदोलनाचं नेतृत्व करत नाही. तर समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, असंही ते म्हणाले.

समाजाची दिशाभूल करू नका

केंद्र आणि राज्य सरकारला मदत करण्याचीच आमची भूमिका आहे. पण या समाजाला कोणीही वेठिस धरू नये. समाजाची दिशाभूल होऊ नये हे आमचं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितलं. समाज अस्वस्थ आहे. हे मान्य आहे. पण कोरोना काळात जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. आंदोलनापेक्षाही जीव वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकारने समाज रस्त्यावर उतरणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.

आंदोलन आणि उद्रेक शब्दही नको

समाजाने 58 मोर्चे काढलेले आहेत. त्यातून सरकारपर्यंत भावना पोहोचवण्यात आल्या आहेत. आता कितीवेळ लोकांना रस्त्यावर आणायचं? कोरोनाचं वातावरण आहे. त्यामुळे आंदोलन आणि उद्रेक हा शब्द काढणंही योग्य नाही, असं सांगतानाच सर्व पक्षीय नेत्यांनी या प्रश्नावर काय मार्ग काढता येईल ते पाहावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

राजे देश सारा हादरून सोडा…

संभाजी छत्रपती यांनी छत्रपती शाहू महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शाहू महाराजांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. तसेच ‘छत्रपती संभाजीराजे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी ‘राजे देश सारा हादरून सोडा, राज्यकर्त्यांची वाचा फोडा…’ अशी नवी घोषणाही देण्यात आली. यावेळी सर्वचजणांनी संभाजी छत्रपती यांनीच या आंदोलनाचं नेतृत्व करावं, अशी मागणी केली.

 

 

मराठा आरक्षणासाठी 5 जूनला बीडमध्ये मोर्चा-आ.मेटे

तयारी पूणर्र्; कोरोनाच्या नियमांचे पालन करत मोर्चा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर येत्या 5 जूनला बीड येथे कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढायचा निर्णय अंतिम झाला आहे. सकाळी 10.30 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मराठा आरक्षण संघर्ष मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी दिली. 
मराठा आरक्षण प्रश्नी नियोजीत मोर्चासंबंधी रविवारी (दि.23) कपिलधार येथे मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले.त्याची माहिती देण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी आ.मेटे बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड.मंगेश पोकळे, सीए.बी.बी.जाधव, गंगाधर काळकुटे, गोपाळ धांडे, सुहास पाटील, मनोज जाधव, महेश धांडे, अशोक सुखवसे आदी उपस्थित होते.आ.मेटे म्हणाले, बीड येेथील नियोजित मोर्चासंबंधी रविवारी कपिलधार येथे व्यापक बैठक घेण्यात आली. याप्रसंगी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 5 जून रोजी शहरातून हा मोर्चा काढण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन, सोशल डिस्टन्स ठेवून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ.मेटे यांनी केले. तसेच हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आ.मेटे म्हणाले, राज्यात यापूर्वी निघालेले सर्व मोर्चे मूक होतेे; मात्र आता बीडमध्ये निघणारा हा मोर्चा मूक नसेल, तर संघर्ष कोणत्या मागण्यांवर करायचा यासाठी तसेच मराठा समाजाला न्याय मागणारा हा मोर्चा असेल असेही आ.मेटे यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा सर्व, पक्ष, गट तट याच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन काढला जाणार आहे. सर्व पक्षाचे मराठा नेते या मोर्चात येऊ शकतात. त्या सर्वांचा आदर, सन्मान केला जाईल. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन राज्य सरकारला दिले जाणार आहे. 

राज्य सरकारच्या मनात पाप 

आता आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नाही पण त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना निदान इतर सुविधा तरी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, पण मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारच्या मनात पाप आहे, त्यामुळे ते समाजासाठी काहीही निर्णय करायला तयार नाहीत.सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. मराठा समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतात काम करतच आयुष्य व्यतित करायचे का? असा सवालही आ.मेटे यांनी केले. 

ते पुढे म्हणाले,  की राज्य सरकारच्या मनात पाप आहे, त्यामुळे ते समाजासाठी काहीही निर्णय करायला तयार नाहीत. सारथी योजनेचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.आता आरक्षण देणे राज्य सरकारच्या हातात नाही.पण त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना निदान इतर सुविधा तरी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. समाजाने केवळ ऊस तोडणी, शेतात काम करतच आयुष्य काढायचे आहे का? असा सवाल उपस्थित करत समाजाच्या प्रगतीसाठी मराठा समाज बांधवानी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील मेटे यांनी केले.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आवाज घुमणार आहे.बीडमधून राज्यातील पहिल्या संघर्ष मोर्चाला सुरुवात होणार आहे. यासाठी मराठा नेते विनायक मेटे यांच्यासह मराठा समाजातील विविध नेते आणि पदाधिकारी आता मोर्चाची तयारी करताना पाहायला मिळत आहेत.

बीडच्या कपिलधार येथे मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटना ची बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये 5 जूनला कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढायचा हा निर्णय अंतिम झालाय. हा मोर्चा 5 जून रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढला जाणार आहे.यावेळी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून हा मोर्चा काढला जाईल.सोशल डिस्टन्स पाळला जाणार असून वैद्यकीय सुविधा देखील मोर्चा दरम्यान राहणार आहेत.

दरम्यान मराठा समाजाला न्याय मागणारा हा मोर्चा असेल,हा मोर्चा सर्व, पक्ष, गट, तटाच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन काढला जाणार आहे.सर्व पक्षाचे मराठा नेते या मोर्चात येऊ शकतात.हा मोर्चा आता मुकमोर्चा नसून बोलणारा असेल, असा इशारा देखील विनायक मेटे यांनी दिलाय.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.