बीड । वार्ताहर
जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची नोंदणी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास,रोजगार व उद्योजगता विभगाने https://www.rojgar.mahaswayam.
mahaswayam हे application विकसित केले आहे. सदर वेबपोर्टलचा व mobile application
चा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी घ्यावा, तसेच यापुर्वी जिल्ह्यातील ज्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी महास्वंयम पोर्टलवर नोदणी केलेली असून आधार क्रंमाक आपले नोंदणी क्रमांकाशी संलग्न केलेले नाही व आपले ई-मेल.माबाईल क्रमांक व पत्ता अद्यावत केलेला नाही,अशा उमेदवारांनी सदर वेब पोर्टलवर अथवा गुगल प्ले स्टोअर मधुन mahaswayam हे application अॅन्ड्रॉइड मोबाईल मध्ये डाउनलोड करुन आपली नोंदणी क्रंमाक ई-मेल, मोबाईल क्रंमाक व पत्ता तसेच शैक्षणिक पात्रता व अनुभव इत्यादीसह तात्काळ अद्यावत करावा.अन्यथा आपली महास्वंयम वेब पोर्टलवरील नोंदणी रद्द हाेईल. तसेच नोंदणी अद्यावत करण्यासाठी उमेदवारांना काही अडचण आल्यास [email protected] या ईमेल वर संपर्क करावा अथवा दुरध्वनी क्रंमाक ०२४४२-२२२३४८ यावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांनी केले आहे.
Leave a comment