आव्हानात्मक स्थितीत आपली कामगिरी उल्लेखनीय
एसपींची पोलीसांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप!
बीड । वार्ताहर
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या स्थितीत रस्त्यावर अहोरात्र आपले कर्तव्य बजावणार्या जिल्हाभरातील सर्व पोलीस बंधू-भगिणींच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे. ‘आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या जिल्ह्यास कोरोना या महामारीपासून वाचविण्यासाठी आपण जी कामगिरी करीत आहात ती अतिशय उल्लेखनीय आहे’ कर्तव्य बजावतानाच आपण प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहनही एसपी हर्ष पोद्दार यांनी केले आहे.
शुक्रवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस दलातील सर्व कर्मचार्यांसाठी एक संदेश दिला. त्यात त्यांनी सर्वांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. एसपी पोद्दार यांनी म्हटले आहे, सर्व कर्मचारी यांनी हँड सॅनिटायझर सोबत ठेवावे. सॅनिटायझरचा नियमीतपणे वापर करावा. प्रत्येक दोन तासाला आपले हात हँडवॉश अथवा साबणाने धुवावे. हात धुवताना किमान 40 सेकंद धुवावे.स्वतःचा हात चेहर्याला लावणे टाळावे.घराबाहेर निघाल्यास मास्कचा वापर करावा. पोलीस लाईन मध्ये ईतर ठिकाणाहून नवीन रहिवासी येणार नाही याची खबरदारी घ्यावी. कर्तव्यादरम्यान आपले सहकारी पोलिसांसोबत व इतरांसोबत संवाद साधताना सुरक्षित (किमान 3 फुट) अंतर ठेवावे. नविन ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी हातमोजे( हँडग्लोव्हज) चा वापर करावा. तसेच सदरील सुचना आपले कुटूंबीय व ईतर संबंधितांनाही सांगाव्यात असे आवाहन एसपींनी केले आहे.
Leave a comment