बीड । सतिष लड्डा
आयुष मंत्रालय नविदिल्ली यांच्या पत्रांच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी अध्यक्षांना पत्र लिहून कोरोना संसर्ग बाबत मास्टर ट्रेनिंग उपक्रम राबविणेबाबत सूचित केले आहे.
कोबीड -19 मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालय,नवी दिल्ली यांनी प्रत्येक राज्यातून जिल्हानिहाय मास्टर ट्रेनर्सची यादी तयार केली असून 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सदरील मास्टर ट्रेनर्सना कोबीड 19 बाबत प्रशिक्षण देण्याचे सुरू करण्यात येत आहे.या ट्रेनिंगनंतर राज्यामधील सर्व नोंदणीकृत होमिओपॅथिक व आयुरवर्दीक डॉक्टरांना सात दिवसांच्या कालावधीत कोबीड -19 बाबत प्रशिक्षण देणे सुरू केले जाणार आहे . कोरोना आजाराच्या संभाग्य आपत्कालीन परिस्थितीला समर्थपणे हाताळण्यासाठी आयुष डॉक्टर्स यांना प्रशिक्षीत देऊन तज्ञ आयुष डॉक्टर्स उपलब्ध करता येतील. या कामी राज्यातील सर्व नोंदणीकृत आयुर्वेद , युनानी व होमिओपॅथीक डॉक्टर्सना सदरहू कोबीढ - 19 बाबत प्रशिक्षण देऊन यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आयुष डॉक्टर्स यांना प्रमाणिकीकरण करण्यासाठी आवश्यक सविस्तर कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याबाबतचा दैनिक कार्यपूर्ती अहवाल या संचालनालयास सादर करावा,सोबत आयुष मंत्रालय,नवी दिल्लीद्वारा प्रसिध्द करण्यात आलेल्या कौवीड़-19 बाबतच्या गाईडलाईन्स व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय,मुंबई द्वारा कोवीड- 19 बादत प्रसिध्द करण्यात आलेले लेाशिपवर्ळीा जोडले आहे. आपणास विनंती आहे की,यास जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी व आपल्या परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात यावे.अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपथी मुंबई यांना निर्देशित करण्यात येते की,त्यांनी अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन,मुंबई यांचे संपर्कात राहून होमिओपैथी डॉक्टरांची ट्रेनिंग होईल याबाबत दक्षता घ्यावी. कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीमुळे आपत्कालीन कायदा लागू झाला असल्यामुळे उपरोक्त प्रशिक्षण राज्यातील सर्व नोंदणीकृत आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी डॉक्टर देण्यात येण्यासाठीचा खर्च हा परिषदांच्या निधीतून भागविण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे.
Leave a comment