बीड । वार्ताहर
संचारबंदी,जमावबंदीचा आदेश झुगारुन ऊसतोड मजुरांना घेऊन जालन्याकडे निघालेले चार ट्रॅक्टर गेवराई पोलिसांनी गुरुवारी पकडले. त्यातील 75 मजुरांना ताब्यात घेतले. या प्रकरणी चारही ट्रॅक्टरचालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
देविदास लक्ष्मण कासार (रा. दैठण जि. जालना), नवनाथ एकनाथ आघाव,शाम दिनकर भालेराव (रा.जोगलादेवी जि. जालना), अनिश फकीरमिया पठाण (रा. घुंगर्डे हातगाव जि. जालना) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. हे चौघेही चार ट्रॅक्टरमधून एकूण 75 ऊसतोड मजुरांसह सांगलीहून बीडमार्गे जालन्याकडे जात होते. खामगाव फाट्यावर नाकाबंदी सुरु असताना ते गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता आढळले. संचारबंदी, जमावबंदी तसेच रस्ते वाहतूक बंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहायक फौजदार संजय गफाट यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, ट्रॅक्टरमधील 75 मजुरांना तात्पुरत्या निवारागृहात पाठवून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
Leave a comment