निवडणुकीवर बहिष्कार टाकला नाही म्हणून डुब्यात नोटा विजयी
माजलगाव : उमेश जेथलिया
माजलगाव तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीचा आज निकालास सुरुवात झाली आहे.डुबामजरा या गावात सरपंच पद सर्वसकधारण वर्गास होते मात्र येथील बहुतांश मराठा समाजाने मराठा आरक्षण समर्थनार्थ निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही काही उमेदवारणी निवडणूक लढवली. काल झालेल्या मतदानात मंतदारानी मतदानाचा हक्क बजावत आपले मतदान "नोटा" ला दिले आजच्या निकालात इतर चार उमेदवारपेक्षा नोटाला सर्वाधिक 275 मतदान झाले यामुळे सरपंच पदाचे सर्व उमेदवार पराभूत झाले असून आता सरपंच पदाची पुन्हा निवडणूक होणार आहे.
डुबा माजरा येथे मराठा आरक्षण समर्थनार्थ ग्रामपंचायत निवडणुकी वर बहिष्कार टाकण्याची इच्छा असताना उमेदवारांनी निवडणूक लावल्याच्या निषेदार्थ सरपंच पदला सर्वाधिक नोटाला मतदान पडल्यामूळे सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले. याठिकाणी सरपंच पदाची निवडणूक पुन्हा घ्यावी लागणार आहे. पराभूत उमेदवारांना आता नोटच्या नियमानुसार पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. पॅनल साठी चार ही उमेदवाराचा लाखो रु चा खर्च पाण्यात गेला.
Leave a comment