गेवराई । वार्ताहर
येथील रहिवासी व मुंबई येथे आरोग्य सेवा करणार्‍या डॉक्टराला मंगळवारी राञी प्रशासनाने गेवराई येथील पोलिस स्टेशन जवळील निवासस्थानी होम क्वारंटाईन केले. सदरील डॉक्टर हा सोमवारी राञी दहाच्या सुमारास मुंबई येथून आपल्या वाहनातून गेवराई येथे आला होता. हा डॉक्टर मुंबई येथून गेवराईकडे ठिकठिकाणी चेक पोस्ट असताना गेवराईत आला कसा? त्याला विचारणा का केली नाही असे एक ना अनेक प्रश्‍न गेवराई शहरातील नागरिक उपस्थित करत आहे.
गेवराई शहरातील सदरील डॉक्टर दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई येथील एका नामांकीत दवाखान्यात आरोग्य सेवा म्हणून काम करत आहे. आजवर त्यांची ही सेवा कायम आहे. सध्या जगात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भारत देशात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई येथे आढळून येत आहे. अशातच मुंबई येथील व सध्या गेवराई येथे निवासस्थान सलेले हे डॉक्टर सोमवारी राञी आपल्या वाहनातून गेवराईत आले आहे. त्यामुळे व मुंबई येथील हे डॉक्टर असल्यामुळे परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊनही माहिती या भागातील नागरिकांनी गेवराई प्रशासनाला दिली. त्यानुसार मंगळवारी राञी आठच्या सुमारास आरोग्य विभागातील डॉ.शेख, आंधळे व अन्य डॉक्टरसह तलाठी राजेश राठोड, पोलीस आईटवार आदिनी निवासस्थानी जाऊन त्यांना होम क्वारांटाईन केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.