बीड । वार्ताहर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापूर्वी माणुस असून माणसाला त्याचे अधिकार दिले जात नव्हते.एवढेच नाही तर न्याय मागण्याचा, बोलण्याचा, शिक्षणाचा, संपत्तीचाही अधिकार दिला जात नव्हता. परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे या देशातल्या संबंध मानव जातींच्या कुळांचा उध्दार झालेला आहे. असल्याचे परिवर्तनिय विचार युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी व्यक्त केले.
बीड येथील रिपाइंच्या मध्यवर्ती कार्यालयात मंगळवार (दि.14) एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतिनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतो. त्यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करतांना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी. आ.राजेंद्र जगताप, राजू जोगदंड, वंचितचे अशोक हिंगे, बबन वडमारे यांची उपस्थितीती होती.पप्पु कागदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायावर आधारीत संविधान लिहून या देशात समता,स्वतंत्रता आणि बंधूत्वाची बीजे रूजवीली आहेत. तसे पाहता, दरवर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात, मिरवणुका काढून जगभर साजरी केली जाते.मात्र,या वर्षीच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे यंदाची आंबेडकर जयंती जिल्ह्यासहीत देशातील आंबेडकरी समुहाने शिस्तीचे काटेकोरपणे पालन करून आंबेडकर जयंती घरी साजरी केली आहे. यातून आंबेडकरी जनतेनी एक सृजनशिल समाज म्हणून जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेची ही भुमिका अभिनंदणीय आहे. असल्याचे मनोगत पप्पु कागदे यांनी यावेळी व्यक्त केले.
Leave a comment