गेवराई । वार्ताहर
कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. उगीचच बाहेर पडू नका, गरज पडल्यास मास्क वापरून घराबाहेर पडा, असे आवाहन आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे बोलताना केले असून, मंगळवार ता. 15 रोजी सकाळी अकरा वाजता बाळानाथ सेवाभावी संस्थेच्या वतीने शहरात मोफत मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, नियम मोडणारे शोधून काढण्यासाठी नगर परिषदेच्यावतीने आठ पथके तयार करण्यात आली असून, नियम भंग करणार्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली आहे.
मंगळवार ता. 15 रोजी सकाळी अकरा वाजता नगर परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शहरातील लॉकडाऊन कडक करून, मोफत मास्कचे वाटप व अन्य महत्वाचे विषयावर चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभूवनकर, डॉ. राजेश शिंदे, डॉ. नोमाणी महमंद, संजय आंधळे, डॉ. आंधळे, बाळानाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष पोफळे, रखमाजी चौधरी, नपचे कर्मचारी, पत्रकार सुभाष सुतार, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष जुनेद बागवान, पंत, कुरकुटे, यांची उपस्थिती होती. घराबाहेर येणार्या नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने आठ पथके तयार करण्यात आली असून, नियम भंग करणार्या नागरिकांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली आहे. कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करून, नागरीकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडायचे आहे. तोंडाला मास्क वापरून, सार्वजनिक ठिकाणी खोकताना, शिंकताना नाकावर स्कार्फ किंवा मास्क लावायचा आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या विरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे, नागरीकांनी नियम पाळावेत असे आवाहन नगर परिषदचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी केले आहे. दरम्यान, कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. गरज पडल्यास मास्क वापरून घराबाहेर पडा, असे आवाहन आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे बोलताना केले.
Leave a comment