परळी । वार्ताहर
परळी शहराला वीजपुरवठा करणार्या डाबी येथील 132 केव्ही सबस्टेशन मध्ये काही फॉल्ट झाला की परळी शहर अंधारात असायचं! परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आता यावर पर्यायी उपाय काढला आहे.
आता परळी शहरासाठी सिमेंट फॅक्टरीकडे येणारी दाऊतपूर 33 के.व्ही. वीज लाईन कालरात्री देवी सबस्टेशनला जोडण्यात आली आहे. या लाईनचे परीक्षण यशस्वी झाले असून वापरही सुरू करण्यात आला आहे.यामुळे डाबी सबस्टेशनला आता पर्यायी व्यवस्था झाली असून, डाबी कडील वीज पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला तरी या दुसर्या लाईनमुळे परळीकरांना अखंडित वीज मिळणार आहे.याबाबत धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार दि.31 मार्च रोजी बीड महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सरग व अंबेजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता कुरेशी यांनी या कामाची पाहणी करून तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश दिले होते.
Leave a comment