आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील कोरोना व्हायरसचा पिंपळा येथे एक रूग्ण सापडल्याने त्या परिस्थितील 11 गावात संचारबदी लावली आहे. या गावाचा संपर्क तोडला आहे.अशा परिस्थितीत तेथील ग्रामस्थांसाठी धान्य, किराणा, भाजीपाला याबद्दल काय उपाययोजना केल्या आहेत.कोरानाचे संकट पिटाळुन लावण्यासाठी शासन, जिल्हा व तालुका प्रशासन काय उपाययोजना करीत आहे हे पिण्याचे पाण्याचे सोईसाठी टकर सुरु केले का? टकरची मागणी असेल तेथे तात्काळ टकर द्या. निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थीना तात्काळ मानधन अशा अडचणीच्या काळात देण्यात यावे. आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघातील ऊसतोडणी मजुरांना स्वगृही आणण्याचे शासन, प्रशासनाव्दारे प्रयत्न व्हावेत या व इतर महत्त्वाचे प्रश्नी माजी आ.भीमराव धोंडे यांनी आष्टीतील आपले निवासस्थानी मोजक्या अधिकार्यांची सोशल डिस्टन्स ठेवुन बैठक घेतली.
याबैठकीस तहसिलदार निलीमा थेऊरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोठुळे, डॉ.राहुल टेकाडे, डॉ.बी.पी.गुट्टे हे उपस्थित होते. आष्टी मतदार संघातील जनतेने नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असा जनतेला आपला संदेश आहे असे सांगत कोरोना व्हायरस संसर्ग रोखणे आपल्या सर्वाचे व प्रशासनाचे ध्येय आहे. त्यामुळे प्रशासनाने जे जे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत. नियम पाळावेत. नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई केली होणार आहे. विना मास्कचे बाहेर येऊ नये. जिल्हा व तालुका प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारची दक्षता घेतली जावी. संचारबंदीच्या काळात शासन आणि प्रशासन यांनी याबाबतीत सतर्क राहावे. जनतेच्या हितासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करत प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. घरातच राहा, आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या, संचारबंदीच्या कालावधीत घरातून कोणीही बाहेर पडू नका. घरात बसाल तरच. कोरोनापासुन वाचाल. नागरिकांनी पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे व अनावश्यक बाहेर फिरू नये. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत आलेल्या सूचनांचे पालन व्हावे, जे कामानिमित्त बाहेरगावी होते ते तालुक्यात आले आहेत त्या सर्व नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन आपली माहिती प्रशासनास द्यावी. आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, प्रशासनाला योग्य ते सर्व सहकार्य करावे असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
Leave a comment