दिवंगत उद्योजक रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. रतन टाटा यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्या हाती टाटा समूहाची सूत्रे येणार आहेत. टाटा ट्रस्ट बोर्डच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रतन टाटा यांच्या नावे 3800 कोटींची संपत्ती आहे असल्याचे म्हटले जाते. रतन टाटा हे अविवाहित होते. त्यामुळे टाटा समूहाची धूरा त्यांच्या पश्चात कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली होती.
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे.
नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पेरेंट कंपनी आहे.
नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्त्वात ट्रेंटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला.
Leave a comment