तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा

तर.. अजित पवारांची गाडी अडवू ..भाई ऍड.नारायण गोले पाटील

माजलगाव प्रतिनिधी

बिड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळाचा पिकविम्याच्या २५ टक्के अग्रीमसाठी समावेश करा परिसरातील शेतकऱ्यांचा
गंगामसला परिसरातील  शेतकऱ्यांची मागणी.
माजलगाव तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात २१ दिवसापेक्षा जास्तीचा पावसाचा खंड पडला असुन गंगामसला महसूल मंडळात पिके नेस्तनाबूत होत असताना पिकविम्याच्या अग्रीमसाठी गंगामसला महसूल मंडळ वगळले आहे.जिल्ह्यातिल सर्वच महसुल मंडळाला २५ टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ६१ मोठेवाडी फाटा छोटेवाडी येथे दि.२५ आॅगस्ट शुक्रवार रोजी तब्बल दिड तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
  तालुक्यातील  गंगामसला महसूल मंडळात पावसाचा २१ दिवसापेक्षा पाऊस न होऊन देखील व पिके नेस्तनाबूत होत असताना पिकविम्याच्या अग्रीमसाठी गंगामसला महसूल मंडळ वगळले आहे.ही बाब अत्यंत चुकीची असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. करीता गंगामसला महसूल मंडळात २१ दिवसापेक्षा जास्त दिवस पाऊस न पडल्याने २५ टक्के अग्रीम साठी समावेश करण्यात यावा यासह गंगामसला महसूल मंडळाला २५ टक्के अग्रीम तात्काळ मंजूर करण्यात यावा,२५ टक्के अग्रीमसाठी २१ दिवसाची अट रद्द करून पावसाचा १५ दिवसाचा खंड ग्राहय धरण्यात यावा,अति वृष्ठीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळधिकारी, यांनी सज्जावर हजर राहवे,गाव निहाय पर्जन्यमापक बसवण्यात यावे,सन २०२२ २३ चा राहिलेला विमा तात्काळ देण्यात यावा इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास अजित वारांची गाडी आडवणार असल्याचा इशारा भाई ऍड नारायण गोले पाटील यांनी दिला . 
दिड तास रस्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.माजलगावच्या तहसिलदार वर्षा मनाळे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, या आंदोलनात
 भाई अॅड.नारायण गोले पाटील, काॅ.मुस्तदिक बाबा, सुदर्शन हिवरकर, अंगद कटके,ज्ञानेश्वर काळे,राजाभाऊ शेरकर, अविनाश गोंडे, जगन्नाथ खेत्री, विद्यासागर करपे, जगन्नाथ डाके, दिपकराव सोळंके, राहुल सुरवसे ,भगवान पवार, अॅड.पांडुरंग गोंडे, प्रभाकर खेत्री, ज्ञानेश्वर खेत्री, माऊली खेत्री,अशोक रासवे, परमेश्वर खेत्री, अॅड.तुळशीराम रेडे, गजानन गोंडे,भाई मुंजा पांचाळ, विलास जाधव, हनुमान पांचाळ, सचिन पांचाळ,वैजनाथ कटके यांच्यासह हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.